अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त बुद्ध वंदना
उरण दि 15(विठ्ठल ममताबादे )
75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उरण बौध्द वाडी येथे बौध्दजन पंचायत समिती शाखा नं 843 च्या वतीने बुद्ध वंदना देण्यात आली.
यावेळी अध्यक्ष प्रकाश कांबळे, उपाध्यक्ष अखिलेश जाधव, सचिव विजय पवार, बौध्दाचार्य महेंद्र साळवी, विनोद कांबळे, जितेंद्र भोरे, जयेश कांबळे व इतर सभासद उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमही यावेळी राबविण्यात आले.