Ultimate magazine theme for WordPress.

आंबेत पूल दुरुस्तीत भ्रष्टाचार

0 60

दापोलीतील विनय जोशी यांच्या तक्रारीने खळबळ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची घेणार भेट

दापोली : आंबेत पूल बंद- चालू- बंद करण्यात आणि लोकांना अभूतपूर्व अडचणी निर्माण करण्यात खरंच काही तांत्रिक अडचणी होत्या का रायगड, रत्नागिरी बांधकाम विभाग, सरकारी अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक, जेट्टी मालक यांची काळी, भ्रष्ट हातमिळवणी होती याची विभागीय चौकशी करण्याची मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार आहे. त्यामुळे विनय जोशी यांच्या तक्रारीने खळबळ उडाली असून या पूल दुरुस्तीप्रकणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विनय जोशी यांनी केला आहे.

याशिवाय मी नियंत्रक आणि महालेखापाल- कॅग, नवी दिल्ली याना आंबेत पूल प्रकरणात काही घोटाळा झाला आहे का याची चौकशी करण्याची जी मागणी केली होती मात्र या प्रकरणी अद्याप कोणतेही उत्तर नवी दिल्ली येथील कॅग कडुन जोशी यांना आलेले नाही. त्यामूळे आता हा सगळा विषयावर लवरकच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याप्रकरणी तातडीने चौकशी करण्याचे आदेश दयावेत यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने पाठपुरावा करणार असल्याची महत्वाची  माहिती दापोली तालुक्यातील मुर्डी  येथील नागरीक विनय जोशी यांनी दिली.

आंबेत पूल बंद असल्याने दापोली, मंडणगड तालुक्यातील नागरिकांना अतोनात व्यावहारिक, आर्थिक आणि व्यावसायिक नुकसान, अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे याचा मी पाठपुरावा करत आहे असेही विनय जोशी यांनी सांगितले.
रायगड व रत्नागिरी जिल्हा जोडणारा हा कोकणातील महत्वाचा पूल आहे या पुलामुळे रत्नागिरी जिल्हयातील
दापोली व मंडणगड तालुक्याला मुंबई पुणेकडे जाण्यासाठी असलेले अंतर जवळ आले व थेट रायगड जिल्हा जोडला गेला.माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर  अंतुले यांनी पुढाकार घेऊन केलेल्या प्रयत्नामूळे आंबेत खाडीवर असलेल्या या पुलामुळे या भागाला महत्व आले व पर्यटकांसाठीही हा पूल महत्वाचा ठरला.

Leave A Reply

Your email address will not be published.