Ultimate magazine theme for WordPress.

आंबे खाण्याच्या स्पर्धेत चिमुकल्यांची धम्माल मस्ती !

0 61

रत्नागिरील तोणदे येथे हापूस ऍग्रो टुरिझमतर्फे तीन दिवसीय समर कॅम्प

रत्नागिरी : हापूस ऍग्रो टुरिझमच्या वतीने तालुक्यातील तोणदे येथे तीन दिवसाचा समर कॅम्प आयोजित केला होता. या तीन दिवसांमध्ये सहभागी मुलांनी मज्जा मस्ती करीत प्रत्यक्ष आंबे काढण्याचा अनुभव घेतला. त्याच वेळेला नदीतल्या आंघोळीची मज्जा देखील काही चिमुकल्यांसाठी काहीशी निराळीच होती.

सोबतच उत्कृष्ट भोजनाबरोबर निसर्गामध्ये राहण्याचा अनुभव प्रत्यक्ष मुलांनी घेतला. रस्सीखेच, स्विमिंग, जंगल सफारी अशा विविध ट्रॅकचे आयोजन केले होते. कॅम्पमध्ये तिसऱ्या दिवशी तर जगावेगळी आंबा स्पर्धा घेण्यात आली ती होती. ही आंबा खाण्याची स्पर्धा. या स्पर्धेला मुलानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आंबे खात असताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत होता तो वेगळाच होता. तोणदे येथील हापूस ऍग्रो टुरिझमचे सर्वोसर्वा दीपक उर्फ बंधू नागवेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आंबे खाण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मंथन मालगुंडकर (या स्पर्धकाने साडेपाच आंबे पाच मिनिटात पूर्ण केले. द्वितीय क्रमांक : हिमानी कीर (चार आंबे खाऊन पूर्ण केला ) तृतीय क्रमांक : राज घाणेकर( यांनी साडेतीन आंबे खाल्ले ). या कार्यक्रमाला शाबासकी देण्यासाठी तोणदे गावचे सरपंच सचिन भुवड, तोणदे देवस्थान अध्यक्ष महेश महाकाळ, उद्योजक प्रकाश लिमये, सामाजिक कार्यकर्ते विनय फळणीकर आणि आयोजक बंधू नागवेकर व सर्व स्पर्धेतील मुले आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हा आगळा वेगळा कार्यक्रम घेत असताना मनाला समाधान मिळते व यापुढे असेच कार्यक्रम घेण्याचे आश्वासन आयोजक बंधू नागवेकर यांनी केले

Leave A Reply

Your email address will not be published.