आरवली : आरवली आणि माखजन येथील पोलिस चौकीच्या नूतन इमारतीचे उदघाटन महाराष्ट्र दिनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी, ग्रामस्थ, पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1993 मध्ये मुंबईत बॉम्बब्लास्ट झाल्यावर आरवली माखजन मुख्य रस्त्यावर आंबव फाटा येथे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस चेक पोस्ट उभारण्यात आला. तेव्ह या चेक पोस्ट इमारतीची दुरुस्ती करण्यात आली नव्हती. संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी पुढाकार घेत लोकसहभागातून आरवली आंबव फाटा येथे चेक पोस्टची नवीन इमारत बांधण्यात आली. या चेकपोस्ट इमारतीचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॅॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले. या चेक पोस्टसाठी आरवली येथील श्रीमती लक्ष्मीबाई सोनू भुवड यांनी जमीन मोबदला दिली. या इमारतीचे उद्घाटन डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले
या कार्यक्रमांना डीवायएसपी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक उदय झावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख, माजी सभापती कृष्णा हरेकर, माखजनच्या सरपंच दीपा खातू, बुरंबाडच्या सरपंच नम्रता कवळकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष महाडिक, सुशिल भायजे, बाबू डेरे, शेरेआलम खोत, संध्या बने, गणपत चव्हाण, शैलू धामणस्कर, अरविंद जाधव, हनिफ महाते आदि पोलीस कर्मचारी, व्यापारी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणार्या पोलीस पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे यांनी केले. पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
आरवली चेक पोस्ट व माखजन पोलिस चौकी इमातीचे पोलिस अधीक्षक डॉ. गर्ग यांच्या हस्ते उद्घाटन
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |
Prev Post