उरण (विठ्ठल ममताबादे) : 190-उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने भारतीय जनता पार्टी पागोटे व ग्रामपंचायत पागोटे यांच्या संयुक्त विदयमाने विविध सामाजिक उपक्रम राबवून आमदार महेश बालदी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गावातील गरजू महिलांना अन्न धान्य वाटप व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, शाळेतील विदयार्थ्यांना वह्यांचे वाटप, छत्र्यांचे वाटप, कचरा कुंडीचे वाटप, वृक्षारोपण तसेच खास करून ग्रामपंचायत पागोटे यांच्याकडून गैस सिलेंडर डिझायरचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमापूर्वी 1984 च्या आंदोलनातील हुतात्म्यांना मान्यवरांनी पुष्पहार घालून मानवंदना दिली. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना भाजपाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केले.तर मान्यवरांचे स्वागत पागोटे ग्रामपंचायतचे सरपंच मिलिंद तांडेल व भाजपा पागोटे अध्यक्ष विजय पाटील यांनी केले. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत,तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर यांनी वाढदिवस निमित्त शुभेच्छापर आपले मनोगत व्यक्त केले.
कामगार नेते जितेंद्र घरत, सरचिटणीस उरण तालुका सुनिल पाटील, निखिल माळी या मान्यवरांच्या हस्ते गावातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी गावचे उपसरपंच रश्मी म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य हर्षाली पाटील, मिता पंडीत, वनिता पाटील, ग्रामपंचायत सदस्य-प्रदिप पाटील, माजी सरपंच योगेश पाटील, ग्रामविकास मंडळ अध्यक्ष आशिष तांडेल, कामगार नेते निकेश पाटील, भाजपा महिला अध्यक्ष पागोटे नंदिनी ठाकूर,महालन विभाग अध्यक्ष वैजयंती पाटील,भाजपा कार्यकर्ते राकेश म्हात्रे, मनीष तांडेल, कुंदन पाटील,निलेश पाटील,निशांत पाटील,उज्वला पाटील, उर्मिला ठाकूर तसेच गावातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.