संगमेश्वर : तालुक्यातील मावळंगे गवळवाडी येथे आमदार शेखर निकम यांच्या स्थानिक आमदार निधी टंचाई कार्यक्रमातून नळपाणी योजना रावण्यात आली असून yया योजनेचे उदघाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पार पडले.
अनेक वर्ष येथील वाडीतील ग्रामस्थांना पाणी टंचाई भेडसावत होती मात्र आज वाडीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले व आमदार शेखर निकम यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, जिल्हा बँक संचालक राजेंद्र सुर्वे, सुशील भायजे, गणपत चव्हाण , अनिल मोरे, सुबोध चाव्हण, शांताराम भायजे , भाई मोरे ,शांताराम चोगले, महाडिक गुरुजी , राजेंद्र सुर्वे , दीपक चाव्हान, संतोष जाधव, मनोहर मिरगल , निलेश दाभोलकर, दीपक महाडिक, दिनेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.