इको फ्रेंडली मखरांना ग्राहकांची पसंती
उरण दि. 17 (विठ्ठल ममताबादे ) : सध्या गणेशोत्सव काही दिवसावर आले आहे. सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरे केले जाणार आहे. सध्या अनेक ग्राहकांचा ओढा पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे आहे. त्यामुळे उरण बाजारपेठेत तसेच पूर्व विभागात इको फ्रेंडली कागदी पुठठ्यापासून बनविलेली मखरे मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध आहेत. उरण पूर्व विभागात पिरकोन (फणसवाडी सेक्टर 11)ता. उरण, जिल्हा रायगड येथे कागदी पुट्ट्या पासून इकोफ्रेंडली मखर विक्रीस उपलब्ध आहेत.
इको फ्रेंडली मखरे 2000 रुपयापासून उपलब्ध आहेत. इकोफ्रेंडली मखर वापरल्याने पर्यावरणाची होनी होत नाही. इकोफ्रेंडली मखर वापरल्याने कोणतेही साईड इफेक्ट नाही.उलट पर्यावरणाचे संरक्षण होते. त्यामुळे सर्वांनी इकोफ्रेंडली मखराचा वापर करून इकॉफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा.असे आवाहन सांज आर्टचे मालक सतीश चंद्रकांत म्हात्रे यांनी केले आहे.