https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

0 90


राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अखेर कोसळलं

मुंबई : राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 30 जून रोजी बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं असतानाच बुधवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचं सरकार सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडी मधील मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून बाहेर पडलेला गट फडणवीस यांच्यासोबत असल्यामुळे महाराष्ट्राला नवे सरकार मिळणार आहे.
बुधवारी रात्री उशिराने घडलेल्या घडामोडीदरम्यान भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून आपल्या नेतृत्वाखालील सरकार स्थापनेचा दावा करणार राज्यपालांकडे असल्याची माहिती आहे.

दरम्यान, ठाकरे यांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील बंडखोरांचा गट बुधवारी रात्री गोव्यात दाखल झाला आहे गुरुवारी सकाळी हे सगळे बंडखोर आमदार मुंबईत दाखल होतील अशी शक्यता आहे. दरम्यान,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.