Ultimate magazine theme for WordPress.

उरणच्या किनाऱ्यावर स्फोटक सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ

0 62

प्रत्यक्षात सिग्नल देण्यासाठी वापरात येणाऱ्या फ्लेअर्स असल्याचे स्पष्ट

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील केगाव समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी स्फोटसदृश वस्तू सापडल्याने खळबळ उडाली होती. मात्र त्या फ्लेअर्स असल्याची माहिती आता समोर आली आहे . स्थानिक पोलीस व ओ एन जी सी कर्मचारी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या साध्या फ्लेअर्स आहेत. बोट व ऑफ शोर रिग व त्यांचा वापर आपत्कालीन परिस्थितीत सिग्नल देण्यासाठी केला  जातो.
या फ्लेअर्स आपत्कालीन परिस्थितीत सिग्नल देण्यासाठी बोट व ओ एन जी सी ऑफ शोर रिग वर वापरल्या जातात. उरणच्या केगाव समुद्रकिनारी सापडलेल्या या फ्लेअर्सची एक्सपायरी डेट सँपली होती. त्यामुळे गारबेज ट्रान्स्फरच्या वेळी किंवा बोटीतून त्या समुद्रात पडल्या असाव्यात असे मोरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते यांनी सांगितले आहे. सध्या त्या फ्लेअर ओ एन जी सी येथे डीसपोजलला गेल्या आहेत.
या फ्लॅअर्रचा फक्त आपत्कालीन परिस्थितीत उपयोग केला जात असल्याने बऱ्याच वेळा त्या न वापरता एक्सपायर होऊन जातात. अश्या वेळी त्यांची विल्हेवाट लावणे गरजेचे असते. त्यामुळे या फ्लेअर्स बोटीतून त्यांची ट्रान्सफर करताना किंवा कचऱ्याचे ट्रान्स्फर करताना ओव्हरलोड असल्यास त्या समुद्रात पडू शकतात. व त्यामुळे उरणच्या समुद्रकिनारी देखील बोटीतून पडलेल्या या फ्लेअर्स आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
फ्लेअरचा उपयोग:-
ओ एन जी सी ऑफ शोर रिग, किंवा बोट वर आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास या फ्लेअर सिग्नल देण्यासाठी आकाशात सोडल्या जातात. त्या हानिकारक नाहीत मात्र योग्य प्रकारे विल्हेवाट न लागता इतरत्र कचऱ्यात पडल्या तर छोट्या प्रमाणात आग लागण्याची शक्यता असते.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन:-
आपल्या परिसरात कोणतेही स्फ़ोटक सदृश्य सामान किंवा इतर कोणतेही घातक पदार्थ आढळून आल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला त्वरित कळवावे.कोणतेही अनुचित प्रकार अथवा घटना घडत असेल तर त्वरित पोलीस स्टेशनला संपर्क साधावे असे पोलीस प्रशासना मार्फत कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.