उरणमध्ये गोपीचंद पडळकरांविरोधात राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन
उरण दि. 13 (विठ्ठल ममताबादे ): भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादीचे संस्थापक तथा नेते शरद पवार यांच्यावर नेहमी खालच्या भाषेत टीका करतात विविध बेताल वक्तव्ये करतात त्यामुळे त्यांचा निषेध म्हणून उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी तर्फे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, महिला नेत्या भावनाताई घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण मुळेखंड तेलीपाडा येथे शहराध्यक्ष गणेश नलावडे (नाना ) यांच्या नेतृत्वाखाली गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
उरणमध्ये एका कार्यक्रमा निमित्त भाजप नेते गोपीचंद पडळकर येणार असल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तेलीपाडा येथे गोपीचंद पडळकराचा झेंडे दाखवून निषेध केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष ऍडव्होकेट भार्गव पाटील, युवक तालुकाध्यक्ष कैलास भोईर, शहराध्यक्ष गणेश नलावडे (नाना),तालुका सरचिटणीस प्रकाश म्हात्रे,चाणजे विभाग युवक अध्यक्ष सचिन पाटील,शहराध्यक्ष युवक – सनी म्हात्रे, नागाव अध्यक्ष वैभव कडू आदी राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमचे श्रद्धा स्थान आदरणीय शरद पवार साहेब यांच्या विरोधात गोपीचंद पडळकर हे नेहमी बेताल वक्तव्य करत असल्याने त्यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे उरण शहराध्यक्ष गणेश नलावडे (नाना) यांनी यावेळी सांगितले. यावेळी गोपीचंद पडळ करांचा धिक्कार असो. गोपीचंद पडळकर हाय हाय असा नारा देत गोपीचंद पडळकरांच्या विरोधात घोषणा दिल्या. आंदोलन सुरू झाल्याबरोबर घटना स्थळी पोलिस कर्मचारी पोहोचले. त्यांच्या विनंतीनुसार सर्व कार्यकर्ते शांत झाले व निषेध आंदोलनाचा समारोप झाला. गणेश नलावडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते.