उरण (विठ्ठल ममताबादे) : रायगड जिल्यातील उरण तालुक्याकरीता शासन निर्णयानुसार तालुका स्तरातील दक्षता समितीवर महिला अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, उरणचे तहसिलदार भाउसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शना नुसार उरण तालुक्यातील महिला सामाजिक कार्यकर्त्या तथा उरण तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रेखाताई घरत यांची निवड दक्षता समितीच्या सदस्य पदी करण्यात आली आहे. उच्चशिक्षित सुसंस्कृत, महिलांच्या समस्येची जाण असलेल्या,नागरी समस्यांची जाण असलेले,सुजाण जागरूक नागरिक म्हणून जनता रेखा घरत यांच्याकडे बघते. रेखा घरत यांची उरण तालुका दक्षता समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याने त्यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी रेखा घरत यांनी जिल्हाधिकारी, तहसिलदार तसेच सर्व शासकीय अधिकारी,काँग्रेसचे पदाधिकारी यांचे आभार मानले आहे