उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यात चोरिच्या अनेक घटना वाढत असून काही दिवसापूर्वी उरण मधील समुद्रकिनारी असलेल्या नागाव येथे गाई गुरे शेळ्या बकऱ्या चोरिस गेल्या होत्या. त्यानंतर नवीन शेवा गावात 20 ऑगस्ट 2022 रोजी केशव हनुमंत घरत MH46C 1552 मोबाईल नंबर 9594254596 यांची रात्री रिक्षा चोरिला गेली. ही घटना ताजी असतानाच दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 2 वाजता एका इको गाडी मध्ये नविन शेवा गावातील घरत आळीतील रस्त्यावरील गाईची वासरे चोरी करताना गावातील युवकांनी बघितली. सदर घटना तेथिल सी सी टि.व्ही कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाली आहेत . त्यामूळे उरण तालुक्यात चारिच्या घटनेत वाढ झाली असून या घटनेकडे पोलिस प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष दयावे अशी मागणी नविन शेवा गावचे तंटामुक्ती अध्यक्ष हेमंत सदानंद म्हात्रे यांनी उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल पाटील यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे. उरण तालुक्यातील अनेक गावात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून या चोरीच्या घटनामुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.