उरण दि 11(विठ्ठल ममताबादे ) : दिनांक 10 सप्टेंबर शनिवार रोजी मौजे चिरनेर,तालुका उरण येथे ‘ प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीफ 2022 अंतर्गत फसल विमा पाठशाला उपक्रम राबवण्यात आला.
‘फसल विमा पाठशाला’मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे शेतकऱ्यांना प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे पिकांच्या पेरणीपासून ते काढणी पश्च्यात नुकसानीपर्यंत विमा संरक्षण याबाबत माहिती देण्यात आली आणि या कार्यक्रमाला कृषी पर्यवेक्षक शिवाजी लोहकरे,कृषि सहाय्यक निखिल देशमुख, सरपंच संतोष चिर्लेकर ,कृषिमित्र प्रफुल्ल खारपाटील, एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे तालुका समन्वयक जितेंद्र पिंपळे व महागणपती सेंद्रिय शेती गट चिरनेरचे शेतकरी बांधव उपस्थित होते.