Ultimate magazine theme for WordPress.

उरण पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्वछता मोहीम

0 23

उरण दि 11 (विठ्ठल ममताबादे ) : मनसे नेते अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून  ‘आपला समुद्र किनारा आपली जबाबदारी’ या मोहिमे अंतर्गत  रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर दि. 10/9/2022 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यावेळी जिल्हा सचिव अविनाश पडवळ ,जिल्हाउपाध्यक्ष  प्रवीण दळवी,  उरण तालुकाअध्यक्ष सत्यवान भगत , सचिव अल्पेश कडू,पनवेल तालुकाध्यक्ष  रामदास पाटील , पनवेल उपशहरध्यक्ष संजय मुरकुटे, उरण शहरध्यक्ष धनंजय भोरे , तालुका उपाध्यक्ष राकेश भोईर , दीपक पाटील, विभाग अध्यक्ष बबन ठाकूर , गणेश तांडेल,द्रोणागिरी शहर अध्यक्ष रितेश पाटील,जयसिंग पाटील,प्रणव कारखानीस,प्रदीप ठाकूर,उल्हास गायकवाड,ओम सेरे,सुभाष पाटील,उरण उपशहर अध्यक्ष  हितेश साळुंखे आदी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा उरण तालुक्यातील पिरवाड समुद्रकिनारी अनेक पर्यटक फिरायला येतात व तेथे घाण करतात. कचरा टाकतात. शिवाय दहा दिवसाचे सार्वजनिक गणपती, घरगुती गणपती यांचेही विसर्जन करण्यात आल्याने प्रचंड प्रमाणात कचरा झाला होता. मनसेने उरण पिरवाडी समुद्र किनारी स्वछता अभियान राबविल्याने पिरवाड समुद्र किनारा स्वच्छ व सुंदर झाला. या उपक्रमातून, प्रत्यक्ष कृतीतून मनसेने पर्यावरण जनजागृतीचा, निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.