उरण (विठ्ठल ममताबादे ) : कोकणात ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील वाणिज्य विभाग व अकाउंट अँड फायनान्स विभागाच्या वतीने अकाउंटन्सी मधील करिअरच्या संधी या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले गेले. या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक व वक्ते डॉ. सी ए प्रदीप दत्तात्रेय कामठेकर (फायनान्स अँड अकाउंट ऑफिसर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई) हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता व आवड ओळखून करिअरची निवड केली पाहिजे असे सांगून अकाउंटन्सी मधील करिअरच्या विविध संधी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच महापुरुषांच्या जीवनातील विविध अनुभव चित्रित करून विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी आई-वडिलांचा सन्मान केला पाहिजे असे सांगितले.महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. बळीराम एन. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यात यश प्राप्त केले पाहिजे व मेहनत करून मोठे झाले पाहिजे असे सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन जेष्ठ प्राध्यापक के.ए. शामा सर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. पराग कारुळकर यांनी केला तर सूत्रसंचालन व आभार प्रा. कु. हन्नज शेख यांनी केले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते प्रॅक्टिकल अकाउंटंट अँड टॅक्सेशन प्लस या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. कार्यक्रमात राजेश पवार उपस्थित होते. कार्यशाळेला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.