उरण येथे ई-श्रम कार्ड वाटपासह वृक्षारोपण
श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्थेचा उपक्रम
उरण (विठ्ठल ममताबादे) : आज आपण पहातो की, वाढदिवस साजरा करायचा म्हटला की मोठमोठे हॉटेल किंवा मौजमजेच्या ठिकाणाची निवड केली जाते आणि वाढदिवसाची मजा लुटली जाते परंतु सामाजिक बांधिलकीचा मनुष्यास विसर पडत आहे. परंतु हीच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य व आपला वाढदिवस काहीतरी समाजहितासाठी साजरा व्हावा या उद्देशाने श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण या संस्थेच्या अध्यक्षा रायगड भुषण संगिता ताई ढेरे यांनी आपला वाढदिवस वृक्षारोपण व ई-श्रम कार्ड वाटप करून साजरा के
दि. 3/5/2022 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता कोटगाव काळाधोंडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील मोकळ्या जागेत, व व्यायाम शाळेच्या आजुबाजुला शोभेची झाडे व फुलझाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले.तसेच ई-श्रम कार्ड वाटपाचा कार्यक्रमहि मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
वृक्षारोपण व ई-श्रम कार्ड वाटप या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केअर ऑफ नेचर चे अध्यक्ष रायगड भूषण राजु मुंबईकर, समाजसेवक अनिल घरत, कोटगावचे अध्यक्ष योगेश गोवारी, काळाधोंडा जिल्हा परिषद शाळेचे चेअरमन नवनीत भोईर, जेष्ठ नागरिक शंकर भोईर, कोटगावचे पंच कमिटी सदस्य जितेंद्र भोईर, व इतर कोटगाव ग्रामस्थ, श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण च्या अध्यक्षा संगिता ताई ढेरे, उपाध्यक्षा पुजा प्रसादे,वैदेही वैवडे, कविता म्हात्रे, सुप्रिया सरफरे,अभया म्हात्रे, सारीका भोईर, , कु.महिमा म्हात्रे, तृप्ती भोईर कु.साहिल प्रसादे, शाम भाऊ भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांना एक एक वृक्ष देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला. केअर ऑफ नेचर चे अध्यक्ष राजु मुंबईकर यांनी श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण या संस्थेसाठी ई-श्रम कार्ड मोफत उपलब्ध करून दिले. तसेच सामाजिक कार्यकर्ते राजु मुंबईकर,समाजसेवक अनिल घरत यांनी संगिता ताई ढेरे यांच्या हातुन वेळोवेळी होणार्या समाजकार्यातील योगदानाचा विशेष उल्लेख केला. जमलेल्या प्रत्येक मान्यवरांच्या हस्ते शोभेची व फुलझाडे लावण्यात आली. तसेच या लावलेल्या झाडांना पाणी घालण्याची जबाबदारी कोटगाव ग्रामस्थांनी घेतली आहे.
श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण च्या अध्यक्षा संगिता ताई ढेरे व त्यांच्या सहकारी टिमचे कोटगाव ग्रामस्थांनी आभार मानले.