एक जुलैला देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे यांचा शपथविधी शक्य
मुंबई: उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नवं सरकार स्थापन होणार आहेत. बुधवारी रात्री उशिराने प्राप्त झालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून गुहाटीला असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार गोवा मार्गे मुंबईला येण्यास निघाले आहेत.
आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केल्यावर रात्री उशिरा उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. यावेळी त्यांच्यासोबत अनिल परब यांच्यासह तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित होते.