रत्नागिरी : कोरोनापाठोपाठ कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड योजनेचा लाभ घेता आला नाही. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने स्मार्ट कार्ड योजनेला 30 जून 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
या निर्णयामुळे एसटीने प्रवास करणार्या हजारो ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
