Ultimate magazine theme for WordPress.

एसटी कार्गो सर्व्हिसमधून बेकायदा लाकूड वाहतूक

0 36

साखरपा येथे वनविभागाची कारवाई

देवरुख : एस. टी. च्या कार्गो माल वाहतूक ट्रकमधून जंगली चिरीव लाकडाची बेकायदा वाहतूक करताना देवरूख वन विभागाने कारवाई केली आहे. ही कारवाई शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे तपासणी नाक्यावर करण्यात आली.
याबाबत देवरूख वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुर्शी येथे वन उपजत तपासणी नाक्यावर असणारे वनरक्षक सुरज तेली यांनी सदर गाडी तपासणी नाक्यावर आली असता तपासणीसाठी थांबवली. यानंतर त्यांनी याची माहिती वरिष्ठ व सहकाऱ्यांना दिली. यावेळी गाडीची तपासणी केली असता जंगली चिरीव लाकूड आढळून आले. तसेच चालकाकडे त्यांनी विचारणा केली असता इराण्णा सतिश इंडे (मुळ रा. अक्कलकोट, जि. सोलापूर, सध्या रा. रत्नागिरी) असे नाव सांगून विनापासींगची तुळसणी ते कोल्हापूर अशी लाकडाची वाहतुक करत असल्याचे कबूल केले.
ही कारवाई देवरूखचे वनपाल तौफीक मुल्ला, वनरक्षक सुरज तेली, वनरक्षक संजय रणधीर व वनरक्षक न्हानू गावडे यांनी केली. याप्रकरणी गाडी व चालकाला वनविभागाने ताब्यात घेतले आहे. चालक इराण्णा इंडे याच्याविरोधात वनविभागाकडून भारतीय वनअधिनियम १९२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या गाडीतील सुमारे ४०० घनफुट लाकूड वनविभागाने जप्त केले आहे. तर अशाप्रकारे एस. टी. कार्गो माल वाहतुक गाडीमधून विनापासींगची लाकडाची वाहतुक होत असल्याचे निष्पन्न झाल्याने संगमेश्वर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.