Ultimate magazine theme for WordPress.

ओबीसी आरक्षणा बाबत मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोग

0 54

समर्पित आयोगास निवेदन नोंदणीकरीता शासनाकडून मदत कक्ष स्थापन


रत्नागिरी : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायती आणि शहरातील महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्ही.जे. एन.टी.) आरक्षण देण्यासठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे.

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे. कोकण विभागाकरीता बुधवार 25 मे 2022 रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 4.30 या वेळेत विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन येथे निवेदने स्विकारण्यात येणार आहेत. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आयोगातर्फे निवेदन करण्यात आले आहे.
समर्पित आयोगाच्या समोर निवेदन सादर करण्यासाठी नागरिकांना नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर नोंदणी 24 मे 2022 पूर्वी सकाळी 10 ते सायंकाळी 4.30 वाजता या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे करण्यासाठी खालीलप्रमाणे मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

आर. बी. देसाई उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) जिल्हा परिषद रत्नागिरी दूरध्वनी क्रमांक 02352-222591, एस.एस.सावंत उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) जिल्हा परिषद रत्नागिरी दूरध्वनी क्रमांक 02352-222428, एस.एम. दिंडोर्ले, अ.का. जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी दूरध्वनी क्रमांक 02352-222483, के.पी. वानखडे, महसूल सहायक, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी दूरध्वनी क्रमांक 02352-22483.

Leave A Reply

Your email address will not be published.