संगमेश्वर : कडवई- तुरळ चिखली रिक्षा संघटनेने रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने बांधकाम विभागासमोर सुरु केलेले ठिय्या आंदोलन लेखी आश्वासनाने तुर्तास स्थगित करण्यात आले आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाने लेखी आश्वासन दिले आहे. यानुसार दि. २३ में पासून रस्त्यावरील खड्डे पूर्णता भरले जाणार असल्याचे पत्रात म्हटले आहे म्हणून आम्ही आमचे ठिय्या आंदोलन तुर्तास स्थगित करतं आहोत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी बोलताना दिली
तसेच संघटनेच्या उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या तसेच सर्व पत्रकार आणि सोशल मिडिया च्या माध्यमातून आम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मनात असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.