Ultimate magazine theme for WordPress.

करळ ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी नीलेश तांडेल यांची बिनविरोध निवड

0 18

उरण (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील करळ ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते , सामाजिक कार्यकर्ते नीलेश अनंत तांडेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. बिनविरोध निवड होताच निलेश तांडेल यांच्या मित्रपरिवाराने, ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला निलेश अनंत तांडेल हे स्टेप आर्ट डान्स अकॅड‌मी या उरण मधील प्रसिद्ध डान्स अकडेमीचे संस्थापक आहेत. ते एक उत्कृष्ट निवेदक आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीचे शाखाध्यक्षचे पदही भूषविले आहे. कै.तुकाराम हरी वाजेकर विद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम केले आहे.त्यांनी वकीलीचे शिक्षण सुद्धा पूर्ण केले आहे.उच्च शिक्षित, सुसंस्कृत, सर्वांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्व असल्याने करळ ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी नीलेश अनंत तांडेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

ग्रामसुधारणा मंडळ करळचे अध्यक्ष नीलेश तांडेल, उपाध्यक्ष श्रीकांत तांडेल, सेक्रेटरी चेतन तांडेल, खजिनदार मितेश तांडेल, पंच कुणाल कडू, वैभव तांडेल, धीरज दयानंद तांडेल, दीपेश तांडेल, यतिश तांडेल, विनोद तांडेल, निखिल ठाकूर, हिराचंद्र तांडेल,धीरज सूर्यकांत तांडेल, कमळाकर कडू अशी ग्रामसुधारणा मंडळाची बॉडी असून करळ ग्रामस्थांनी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नवनियुक्त अध्यक्ष तांडेल यांचे अभिनंदन करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. विविध मान्यवरांनी सोशल मीडिया द्वारेही त्यांचे अभिनंदन केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.