उरण (विठ्ठल ममताबादे ): तमाम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा सोमवार दिनांक ०६ जून २०२२ रोजी उरण तालुक्यातील ग्रामपंचायत कळंबुसरे तर्फे संपन्न झाला.महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सदर कार्यक्रम आयोजित करून शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या सोहळ्यास ग्रामपंचायत कळंबुसरेच्या सरपंच नूतन नाईक, उपसरपंच सुनील पाटील, सदस्य उमेश भोईर, दीपक पाटील,सदस्या तारामती नाईक, सरिता नाईक, सुजाता जाधव, मौजे कळंबुसरे तळाठी, ग्रामसेविका स्वाती पाटील, कर्मचारी रविंद्र पाटील, अगंनवाडी सेविका, उद्योजक कुलदीप नाईक तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
कळंबुसरे ग्रामपंचायतीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |