Ultimate magazine theme for WordPress.

काँग्रेसच्या माधुरी जांभळे यांची वासंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड

0 50

उरण (विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील वासंबे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक आज दुपारी 2 वाजता पार पाडली. यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने माधुरी भगवान जांभळे यांनी आपला उपसरपंच पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु त्यांच्या विरोधात एकही अर्ज आला नसल्याने त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उपसरपंच म्हणून घोषित केले.यावेळी मोठया संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष  महेंद्रशेठ घरत यांनी वासंबे येथे जाऊन नवनिर्वाचित उपसरपंच माधुरी भगवान जांभळे यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.व त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी खालापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. कृष्णाशेठ पारंगे, सभापती कांचन पारंगे,रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष  निखिल डवले,प्रतिप पाटील, श्वेता कांबळे ,देविदास म्हात्रे, विनायक डवले, भगवान जांभळे, शाम म्हसकर, सागर सुखदरे, संजय कांबळे, संतोष चौधरी व मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.