Ultimate magazine theme for WordPress.

काँग्रेसतर्फे उरणमध्ये शांततापूर्ण सत्याग्रह

0 16


 केंद्र सरकारचा काँग्रेसने केला निषेध

उरण दि. 26 (विठ्ठल ममताबादे): अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार काँग्रेस नेते नानाभाऊ पटोले यांनी दिलेल्या निर्देशानुसार केंद्रातील हुकूमशाही सरकारचा निषेध करण्यासाठी रायगड जिल्हयाचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवार दि 26/7/2022 रोजी सकाळी 11 वाजता उरण शहरातील महाराष्ट्र बँके समोर असलेल्या गांधी पुतळा येथे केंद्र सरकार विरोधात घोषणा देत लोकशाही मार्गाने शांतता पूर्ण सत्याग्रह करण्यात आले.

केंद्र सरकार विविध अन्यायकारक धोरणे राबवत असल्याने तसेच केंद्र सरकारने ईडी द्वारे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांची चौकशी करून विविध प्रकारे त्रास द्यायला सुरवात केली आहे.याचा निषेध करण्यासाठी शांततामय मार्गाने एकत्र येत शांततामय सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रायगड जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी दिली.तसेच 9 ऑगस्ट 2022 रोजी क्रांती दिन आहे. या दिवशी संपूर्ण भारतात भारत जोड़ो अभियानांतर्गत काँग्रेस पक्षाचे युवा नेते राहुल गांधी यांच्या आदेशानुसार पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला ही पदयात्रा मोठ्या संख्येने काढायची आहे. पदयात्रा यशस्वी करायची आहे. उरण मधून 9 ऑगस्ट 2022 रोजी जासई ते चिरनेर, पुनाडे ते चिरनेर अशा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी,कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी महेंद्र घरत यांनी केले.
या शांततामय सत्याग्रहामध्ये रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, रायगड जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी,महाराष्ट्र प्रदेश सदस्य मनिष पाटील, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे,शहराध्यक्ष प्रकाश पाटील,ओबीसी विभागाचे रायगड जिल्हाध्यक्ष उमेश भोईर, सेवा दलाचे अध्यक्ष कमळाकर घरत, जासई विभाग काँग्रेस अध्यक्ष विनोद पाटील,माजी तालुकाध्यक्ष महेंद्र ठाकूर, माजी नगरसेवक बबन कांबळे, उरण विधानसभा युवक उपाध्यक्ष लंकेश ठाकूर, ओबीसी अध्यक्ष जयवंत पडते तर महिला पदाधिकाऱ्यांमध्ये काँग्रेस पक्षाचे जिल्हा महिला उपाध्यक्ष संध्याताई ठाकूर,जिल्हा महिला सरचिटणीस सीमा ठाकूर,उरण तालुका महिला अध्यक्ष रेखा घरत,उरण तालुका महिला उपाध्यक्ष निर्मला पाटील,पनवेल तालुका महिला अध्यक्ष योगिता नाईक,उरण शहर महिला अध्यक्ष अफशा मुकरी, शहर महिला सरचिटणीस अमीना पटेल, शहर महिला उपाध्यक्ष चंदा मेवाती आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.