Ultimate magazine theme for WordPress.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड

0 37

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवस तसेच जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मुंबईतील आरे कॉलोनी, गोरेगावच्या जंगलात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली वड, पिंपळ आणि करंज या भारतीय झाडांचे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.

या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन पर्यावरण विभागाचे प्रदेश कार्यकारी समिती सदस्य इक्बाल (गुड्डूभाई) खान यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाजभूषण वसंत कांबळे ( विशेष कार्यकारी अधिकारी ) पर्यावरण रक्षक, सामाजिक कार्यकर्ते व युवभारतचे शशी सोनावणे, राष्ट्रीय फेरीवाला महासंघ (NHF) चे राष्ट्रीय महासचिव व पर्यावरण कार्यकर्ते मॅकेन्झी डाबरे यांनीही वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला प्रा. सुजाता वसंत कांबळे आणि डॉ अंकिता वसंत कांबळे यांनीही वृक्षारोपण केले.

यावेळी काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस अभिजित घाग, सचिव अभिजित कांबळे, सचिव अनिल चौगुले, वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप किणी, मुंबई काँग्रेसचे जिल्हा महासचिव बालकृष्णा तिवारी, वसईतील सामाजिक कार्यकर्ते दर्शन राऊत, कुंदन नाईक व देवेंद्र पाटील तसेच गोरेगाव आरे कॉलोनीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.