कामगार एकजूटीचा झाला विजय !
जेएनपीटीच्या वर्धापन दिनी द्रोणागिरी नोडमध्ये जनरल शिफ्टसह तिन्ही शिफ्टमध्ये जेएनपीटी प्रशासनाची बससेवा सुरू
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील द्रोणागिरी शहरातून जे एन पी टी मध्ये कामावर जाण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी विविध कामगार वर्गातून, विविध कामगार संघटनेतर्फे तसेच शिवसेना द्रोणागिरी शिवसेना शाखेने केली होती. विविध कामगार वर्गांने, कामगार संघटनेने व शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेने केलेल्या पाठपुराव्याला आता यश आले असून आता जेएनपीटी प्रशासनाने जेएनपीटी ते द्रोणागिरी अशी बससेवा सुरु केली आहे.
द्रोणागिरी शहरात राहणा-या सर्व कामगारांनी एकजूट होवून तिन्ही शिफ्ट मध्ये व जनरल शिफ्ट मध्ये बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. सर्व कामगारांनी सह्या करून केलेल्या मागणीला दाद देत जेएनपीटी च्या व्यवस्थापनाने दिनांक 2 मे 2022 रोजी मोहनजी व नितीनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली द्रोणागिरी बसचे व मार्गाचे द्रोणागिरी शिवसेना शहर शाखेचे अध्यक्ष जगजीवन भोईर यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व्हे केला. आणि मागणीचा सतत पाठपुरावा केला. या कामी अंतर्गत युनियन व एकता संघटनेने देखील मागणी पत्र दिले होते. सरतेशेवटी मोरे यांनी जे एन पी टी चे सेक्रेटरी जयवंत ढवळे यांची शिफ्ट मध्ये बससेवा सुरू करण्यासाठी मान्यता घेतली.कामगार वर्गांनी व द्रोणागिरी शिवसेना शहर शाखेने विनंती केली होती की सदरची बस 26 मे 2022 या जेएनपीटी च्या वर्धापनदिनीच सुरू व्हावी त्या नुसार जेएनपीटी व्यवस्थापनाने मागणी मान्य केली. जे एन पी टी च्या वर्धापन दिनी ही बससेवा सुरु झाल्याने सर्व द्रोणागिरीतील कामगारांनी जेएनपीटी व्यवस्थापनाचे आभार मानले.तसेच कामगार युनियन चे तसेच ज्यांनी ज्यांनी सह्यांच्या मोहीमेत सहभागी होवून 26 मे 2022 पासून द्रोणागिरी नोड मध्ये बससेवा सुरू करण्यासाठी मदत केली त्या सर्वांचे मनापासून आभार जगजीवन भोईर शिवसेना द्रोणागिरी शहर प्रमुख यांनी मानले. आता कामगारांना जेएनपीटी मध्ये येण्या जाण्यासाठी बसेसची व्यवस्था झाल्याने कामगार वर्गा मध्ये आनंदाचे वातावरण आहे.