Ultimate magazine theme for WordPress.

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या माध्यमातून गणवेश व वह्या वाटप

0 44

उरण (विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्हा काँग्रेसचे डॅशिंग कार्यसम्राट अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या माध्यमातून उरण तालुक्यातील जसखार गावातील जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांना शालेय गणवेश व वह्या वाटप जसखार काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले. यावेळी विद्यार्थांना खालील मान्यवरांच्या हस्ते गणवेश व वह्या वाटप करण्यात आले.या प्रसंगी उरण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद म्हात्रे,तालुका महिला अध्यक्षा रेखाताई घरत, उरण विधानसभा युवक उपाध्यक्ष  लंकेश ठाकूर, कोप्रोली काँग्रेसचे अध्यक्ष विवेकानंद म्हात्रे, जसखार काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  हेमंत ठाकूर, उपाध्यक्ष निलेश तांडेल,माजी सरपंच रमाकांत म्हात्रे तसेच काँग्रेस कार्यकर्ते सुनिल बु.ठाकूर, चेतन घरत,वैष्णव ठाकूर,आकाश ठाकूर,धिरज ठाकूर, शिक्षकवृंद,पालक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.सामाजिक बांधिलकी जपत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता.

Leave A Reply

Your email address will not be published.