शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनी जनसंपर्क अधिकारी कुमार लोंढे यांचा संकल्प
.उरण दि 3(विठ्ठल ममताबादे ) : शेतकरी कामगार पक्षाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त वडखळ (पेण) येथे 2 ऑगस्ट 2022 रोजी शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन दुपारी १ वाजता मोठ्या उत्साहात साजरा झाला.
यावेळी उपस्थित माजी खासदार राजू शेट्टी यांची आरोग्य क्षेत्रातील जनसंपर्क अधिकारी कुमार लोंढे यांनी भेट घेतली.माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यभरातील शेतकरी कामगार वा जनतेच्या आरोग्य संदर्भाततील समस्या सोडवण्याबत जास्तीत जास्त प्रयत्न करा. महात्मा फुले जीवनदायी योजना अंतर्गत गोर गरिबांवर उपचार करून त्यांना न्याय दया असे सांगितले.यावेळी शुश्रुषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पनवेलचे जनसंपर्क अधिकारी कुमार चंद्रकांत लोंढे यांनी गोर गरिबांना योग्य ते उपचार देण्याचे व सर्वसामान्याना न्याय देणार असल्याचे सांगितले. शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनी शेतकरी, कामगार,गोर गरिबांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा संकल्प यावेळी जनसंपर्क अधिकारी कुमार लोंढे यांनी केला आहे.
यावेळी वर्धापन कार्यक्रमात सहभागी होऊन शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना जनसंपर्क अधिकारी कुमार लोंढे यांनी शुभेच्छा दिल्या.