Ultimate magazine theme for WordPress.

कुंभार्ली घाटात कार खोल दरीत कोसळून निवृत्त अभियंत्याचा मृत्यू

0 37

चिपळूण : चिपळूण – कराड मार्गावर कुंभार्ली घाटात कारवरील ताबा सुटल्याने कार सुमारे दोनशे फुट खोल दरीत कोlसळून झालेल्या अपघातात चिपळूणातील सेवानिवृत्त उपअभियंता शंकर भिसे जागीच ठार झाले तर त्यांच्याबरोबर असलेली महिला प्रवासी गंभीर जखमी झाली आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.

सेवानिवृत्त उपअभियंता शंकर भिसे असे या घटनेत मृत्यू झालेल्या अभियंत्यांचं. नाव आहे. ते रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या चिपळूण विभागात शाखा अभियंता म्हणून दीर्घकाळ कार्यरत होते. काही वर्षापूर्वी त्यांना बढती मिळाल्यानंतर त्यांची अमरावती येथे बदली झाली होती. तेथून कराड येथे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते. मे अखेर ते सेवानिवृत्त झाले. , सकाळी ते चिपळूणकडे जात असताना कुंभार्ली घाटात त्यांच्या कारचा अपघात झाला. कारवरील ताबा सुटल्याने सुमारे दोनशे फुट खोल दरीत कार कोसळली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेली महिला अश्विनी दिग्विजय रासकर (32, रा. सातारा) गंभीर जखमी झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.