केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कुटुंबियांसमवेत घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
मुंबई : केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी सोमवारी आपल्या कुटुंबियांसमवेत लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे,भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार, प्रदेश उपाध्यक्ष राज पुरोहित, खा.मनोज कोटक आदी यावेळी उपस्थित होते.