केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेने चिरनेर आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी बालगोपाळांसोबत साजरी केली दहीहंडी!
उरण दि 20(विठ्ठल ममताबादे ) : केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांच्या संकल्पनेतून उरण तालुक्यातील चिरनेर आदिवासी आश्रमशाळेतील चिमुकल्या बाळगोपाळ,विद्यार्थ्यांना गोपाळकाला ( दहीहंडी )सणाचा आनंद लुटता यावा म्हणून चिरनेर आदिवासी आश्रम शाळेत आश्रमशाळेच्या भव्य पटांगणात चिमुकल्या नटखट कान्हांकरीता एक आणि सुंदर राधांकरीता एक अश्या दोन दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या. संगीताच्या तालावर बेधुंद नाचत त्या बाळ गोविंदानीं( मुलांनी ) आणि बाळ राधानी ( मुलींनी ) दहीहांडी फोडून आपला आनंदोत्सव साजरा केला.चिमुकल्यानां दही, पोहा, साखर आणि गोड- खाऊंचं वाटप करून त्या आदिवासी बाळ-गोपाळांच्या सोबत हा आनंदोत्सव अगदी आनंदात साजरा करण्यात आला.
केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर आणि सहकारी मंडळी यांच्या माध्यमातून साकारलेल्या ह्या आनंदोत्सव कार्यक्रमात केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष स्नेहलजी पालकर, मित्र परिवाराचे अध्यक्ष संपेशजी पाटील, उपाध्यक्ष रोशन पाटील,कार्याध्यक्ष कांतीलाल जी म्हात्रे, युवा पदाधिकारी रचित म्हात्रे ( गुड्डू ),सामाजिक कार्यकर्ता प्रवीण कडू व विनोद पाटील,अनिल घरत यांच्यासह चिरनेर आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक,शिक्षकेतर वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.हा सुंदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.