उरण दि. 4 (विठ्ठल ममताबादे) : मिठागर कामगार यूनियनचे संस्थापक अध्यक्ष, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते कै. वीर वाजेकर शेठ यांची बुधवार दि 6/7/2022 रोजी 115 वी जयंती आहे. या जयंती निमित्त बुधवार दि 6/7/2022 रोजी सकाळी 10 वाजता उरण पेठा मिठागर कामगार संघ कार्यालय कोटनाका उरण , जि. रायगड येथे ज्येष्ठ मान्यवर, चेअरमेन, संचालक यांच्या उपस्थितीत जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी उरण पेठा मिठागर कामगार संघ, उरण पेठा मिठ उत्पादक सहकारी मंडळ, उरण महाल सहकारी मजूर संघाचे सदस्य पदाधिकारी यांनी तसेच समस्त वाजेकर शेठ प्रेमी यांनी या जयंती महोत्सवास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आ