कोकण किनारपट्टीवर दोन दिवस वादळी पावसाचा इशारा
रत्नागिरी : कोकण किनारपटट्टीवर 48 तासात कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी वार्यासह जोरदार पावसाची शक्यता कुलाबा येथील वेधशाळेने वर्तविली आहे. दि. 26 मे पर्यंत हा हा इशारा लागू राहणार आहे.
अंदमानच्या समुद्रातील लक्षद्वीप बेटे आणि आसपासच्या भागात दाखल झालेले नैऋत्य मोसमी वारे गेल्या तीन -दिवसांपासून अनुकूल स्थितीच्या अभावामुळे प्रवाहीत होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या वार्यांची प्रगती होत नसल्याने प्रवाह अडकलेल्या स्थिती आहे. बंगालचा उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार झालेली नाही. परिणामी, या वार्याची स्थिती थिजलेल्या अवस्थेत असल्याने मोसमी वार्याची वाटचाल खोळंबल्याची माहिती आयएमडीने प्रसारीत केली आहे.
कोकण किनारपट्टीसह अन्य भागात पूर्व मोसमी पावसाला पोषकता मिळाली असून 25 आणि 26 मे रोजी म्हणजे गुरूवारी आणि शुक्रवारी भागात वादळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बुधवारी दिवसभर रत्नागिरी जिल्ह्यात मळभी वातावरण होते. त्यामुळे तापमानात घट झाली. मोसमी पावसाला पोषक वातावरण असताना पूर्व मोसमीच्या वादळी सरी कोकणकिनारपट्टीवर होणार असल्याने किनारी भागात खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.