कोकण रेल्वे मार्गावर दहा प्रवासी गाड्या विजेवर चालविण्याचा १ मे रोजीचा मुहूर्त लांबणीवर
नवीन तारीख लवकरच जाहीर करणार
रत्नागिरी : विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याने कोकण रेल्वे मार्गावर पहिल्या टप्प्यात दोन राजधानी एक्स्प्रेससह मांडवी, कोकणकन्या अशा एकूण दहा प्रवासी गाड्या दि. १ मेपासून विद्युत इंजिन जोडून चालवल्या जाणार होत्या. मात्र, थिवी येथील TSS (ट्रॅक्शन सब-स्टेशनमधील तांत्रिक कारणामुळे हा निर्णय तूर्त लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती आहे
कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्ग विद्युतीकृत झाला आहे. सध्या काही मालगाड्या या मार्गे विजेवर चालवल्या जात आहेत. दि. १ मे पासून 10 प्रवासी गाड्या देखील विजेवर धावणार होत्या. मात्र गोव्यातील थिवी येथील विद्युत उपकेंद्रातील तांत्रिक करणाने हा निर्णय तूर्त लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वे सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे कोकण रेल्वे ने म्हटले आहे.