Ultimate magazine theme for WordPress.

कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील सेवानिवृत्त

0 43

 नवी मुंबई,दि.30: जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून विभागीय आयुक्त पदापर्यंतचा प्रवास, हे माझ्या आई-वडीलांच्या कष्टाचे फळ आहे. शासकीय कामाचे केवळ कागदावर नियोजन करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर भर देऊन काम केले, तर यश निश्चित मिळते. माझ्या कोकणातील एक वर्षाच्या महसूल आयुक्त पदाच्या कारकिर्दीत मला महसूलसह सर्व प्रशासकीय विभागांनी उत्तम सहकार्य केले. असे उद्गार विभागीय आयुक्त श्री.विलास पाटील यांनी काढले.

      कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सेवानिवृत्त  समारंभाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर आयुक्त किसन जावळे, उपायुक्त सर्वश्री मकरंद देशमुख, मनोज रानडे, गिरीष भालेराव, सोनाली मुळे, वैशाली चव्हाण, रविंद्र जाधव, माणिक दिवे तसेच कोकण भवनातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच श्री.विलास पाटील यांच्या पत्नी अमोल विलास पाटील आणि कुटूंबातील सदस्यही या निरोप समारंभास उपस्थित होते.

      18 जुलै 1985 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण करून उपजिल्हाधिकारी पदावर निवड झालेले श्री.विलास पाटील यांची युपीएससीमधून आय.आर.एस. संवर्गात निवड झाली. परंतू त्यांनी ग्रामीण भागात व तळगाळात काम करण्याच्या इच्छेपोटी उपजिल्हाधिकारी पदाला पसंती दिली. श्री.पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्हयातील चंदगड तालुक्यातील काळकुंद्री या गावात दि.11 जून 1962 रोजी झाला. वडील प्राथमिक शाळेत शिक्षक व आई गृहिणी असून देखील श्री.पाटील  व त्यांची भावंड हे सर्वच शासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत आहेत. आपल्या प्रशासकीय कामात व्यस्त असतांनासुध्दा त्यांनी आपल्या गावाची नाळ तोडली नाही. गावाच्या विकासासाठी त्यांनी त्यांच्या स्तरावर जमेल ती कामे केली.

यावेळी विविध अधिकाऱ्यांनी समयोचित भाषणे केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर आयुक्त मुंबई किसन जावळे हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी डोंगरे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.