https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

कोरोनाचे रुग्ण वाढत राहिल्यास मुंबईत निर्बंध लागण्याची शक्यता

0 70

पालकमंत्री अस्लम शेख यांचे संकेत

मुंबई, : मुंबईत पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या अशीच वाढत राहीली तर मुंबईत पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात येण्याची शक्यता आहे.

या संदर्भात मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री असलम शेख यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत कोविड रुग्णसंख्या वाढते आहे याबाबत आढावा घेऊन चर्चा झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, आज मंत्रिमंडळ बैठकीत जे मुद्दे होते त्या सर्वांवर चर्चा झाली.

कोविडचे रुग्ण वाढले त्यावर चर्चा झाली. संख्या वाढली तर येत्या काळात निर्बध येण्याची शक्यता आहे. लोकांनी काळजी घेतली पाहिजे, अशीच रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा निर्बंधांची वेळ येईल.

कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले आहे.

राज्यातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.59 टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी आढळते.

मुंबईत रुग्णसंख्येत 52.79 टक्के वाढ झाली आहे. ठाण्यामध्ये 27.92 टक्के तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात 18.52 टक्के आणि 68.75 टक्के वाढ झाली आहे.

सध्यस्थितीत मुंबईत एकूण 1531 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुप्पटीचा दर 3973 दिवस इतका आहे. तर कोरोना बाधित रुग्णवाढीचा दर (18 मे – 24 मे) या कालावधीत – 0.017 टक्के इतका आहे.*

Leave A Reply

Your email address will not be published.