कोरोना रत्नागिरीच्या वेशीबाहेरच!
जिल्ह्यात सध्या तरी
चौथ्या लाटेचा परिणाम नाही
रत्नागिरी : महाराष्ट्रात काही विशेषत: मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढली असली तरी रत्नागिरी जिल्ह्यात मात्र कोरोनाच्या चौथ्या लाटेचा कोणताही परिणाम झालेला नाही.जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ एकच रुग्ण अॅक्टीव्ह असून आरोग्य विभागाने या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज केली असली तरी लसीकरणामुळे रुग्ण संख्या वाढणार नाही. नागरिकांनी केवळ खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन आता वैद्यकीय अधिकार्यांकडून केले जात आहे.
चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्याच्या सूचना रत्नागिरी जिल्ह्याला पण देण्यात आल्या होत्या. मात्र, आरोग्य यंत्रणा महिनाभर आधीच सज्ज झाली ली तरी या लाटेचा अंशत: परिणामही जिल्ह्यात दिसून येत नाही, ही अत्यंत दिलासादायक बाब असून हजारो चाकरमानी मुंबईतून दाखल झाले असले तरी सध्या काळजी करण्या सारखी परिस्थिती नाही. जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.