कोल्हापुरातील ग्रा. पं. च्या विधवा प्रथा बंदीचे राज्य शासनाच्या परिपत्रकात रूपांतर
राज्य शासनाचा स्वागतार्ह निर्णय
कोल्हापूर : विधवा प्रथा बंद व्हावी, यासाठी राज्य शासनाने परिपत्रक काढले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्याच्या ठरावाचे रूपांतर आता शासन परिपत्रकात करून राज्याने चांगला निर्णय घेतला आहे.
राज्यातील ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदीसाठी हेरवाडचा आदर्श घेऊन कार्य करावे, असे या परिपत्रकात म्हटले आहे.