Ultimate magazine theme for WordPress.

खवले मांजराची खवले तस्करी करणा-या एकाला महामार्गावर पकडले

0 38


गोळवली यादववाडी येथील घटना

संगमेश्वर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गवर संगमेश्वर तालुक्यातील गोळवली यादववाडी बसथांबा येथे खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणारºया प्रौढाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संगमेश्वर पोलिसांच्या मदतीने सापळा लावून ताब्यात घेतले. ही कारवाई गुरूवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ महादेव पंडव (४९, चिखली, पंडववाडी, ता. संगमेश्वर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या प्रौढाचे नाव आहे. गोळवली यादववाडी बसथांबा येथे गुरूवारी सायंकाळी एक व्यक्ती खवले तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थतिक गुन्हे अन्वेष वि•ाागाच्या पथकाला मिळताच या पथकाने गोळवली गाठत याठिकाणी सापळा रचला. यावेळी त्यांच्यासोबत संगमेश्वर पोलीस होते. याठिकाणी एक व्यक्ती आली असता पथकाने त्याची चौकशी केली असता त्याच्याकडील पिशवीमध्ये खवले मांजराची खवले असल्याचे आढळून आले.
यानंतर पथकाने त्या व्यक्तीला खवल्ल्यांसह ताब्यात घेतले. त्याची आधिक चौकशी केली असता एकनाथ महादेव पंडव असे नाव सांगून चिखली येथील असल्याचे सांगितले. दरम्यान, याबाबतची फिर्याद एलसीबीचे पोलीस फौजदार प्रशांत बोरकर यांनी दिली आहे. यानंतर एकनाथ पंडव याला एलसीबीच्या पथकाने अधिक तपासासाठी एकनाथ पंडव याला संगमेश्वर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे संगमेश्वर तालुक्यात खवले मांजराची तस्करी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संग्रहित छायाचित्र
Leave A Reply

Your email address will not be published.