खेड बाजारपेठेवर पुराची टांगती तलवार !
जगबुडी वाहतेय धोका पातळीच्या वर ; नागरिकांना प्रशासनाने ध्वनिक्षेपकामार्फत केले सावध
खेड :रत्नाागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असतानाच खेड शहराजवळून वाहणा-या जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. तेथील बाजारपेठेला पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. बुधवार १३ रोजी सायंकाळी ५ वाजता जगबुडी नदी पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा १.२५ मीटरने अधिक वाहत होती. पुराची टांगती तलवार लक्षात घेऊन प्रशासनाने नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शहरासह तालुक्यातील ग्रामीण •ाागात देखील प्रशासनाकडून ध्वनिक्षेपकवरून नागरिकांना सावध करण्यात आले आहे.
खेड तालुक्यात गेल्या अठेचाळीस तासापासून पावसाची संततधार सुरू असुन त्यामुळे तालुक्यातील जगबुडी, नारिंगी, चोरद, चोरटी, सोनपात्रा आदी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण ११९५ मिलिमीटर एव्हडी पावसाची नोंद खेडमध्ये झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने खेड तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यामध्ये तालुक्यातील मौजे खारी येथील श्री. अनिल गंगाराम मोहिते यांचे घराचे पावासामुळे अंशत : ३६०० रुपयांचे नुकसान झाले, कसबा नातू येथील श्री . दगडू शंकर शिंदे यांच्या घराचं अंशत : ५ हजार रुपयांचे नुकसान, अस्तान येथील श्री. काशिराम लक्ष्मण सागवेकर यांच्या घराचे अंशत :-५ हजार ७५० रुपयांचे नुकसान, आत्माराम तुकाराम चव्हाण यांच्या घराचे अंशत : २७ हजार ६०० रुपयांचे नुकसान, अलसुरे गावातील श्रीम. सरस्वती काशिराम शिरकर यांच्या घराचे अंशत: ५४ हजार, धामनर येथील सुनिल मारूती हिलम यांच्या घराचे अशंत: ९ हजार रुपयांचे, ग्रामपंचायत धामनंद इमारतीचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.