https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

गडनदी धरण तुडुंब ; नदीकिनारी गावांना सावधगिरीचा इशारा

0 70

मुरडूव, आरवली, खेरेशतसह माखजन पट्ट्यातील गाव सतर्क

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण तुडूंब भरले असून नदीकिनारी असलेल्या मुरडूव, आरवली, खेरेशतसह माखजन पट्ट्यातील गावांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आली आहे.
धरणाची संचय क्षमता 121.15 मिटर असून आजची पाणी पातळी 121.35 मी एवढी असून 20 सेंमी उंचीने पाणी वाहत असून विसर्ग 10.52 घ.मी./ सेकंद आहे सध्या धरणात एकूण 66.699 दलघमी पाणीसाठा असून त्यातील उपयुक्त पाणीसाठा 66.387 दलघमी एवढा आहे गडनदी धरणातून सोमवारी रात्री 8 वाजता सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाली, अशी माहीती गडनदी प्रकल्प कुचांबे उपविभागाचे उपविभागीय अभियंता जी. आय. इनामदार यांनी दिल
शेतकरी वर्गाने नदीपात्रात उतरु नये व स्वतः सह जनावरांची काळजी घेण्याचे आव्हाहन राजिवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष येडगे यांनी यावेळी केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा येथील शेतक-यांना वरदान ठरु पाहत आहे धरणात क्षमतापुर्ण पाणीसाठा झाला असून सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे स्थानिकांमध्ये कुतुहालाचा विषय बनला आहे तर प्रकल्प सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.

सध्या गडनदी धरण क्षेत्रात पावसाला जोर असून 4 जुलै ते 7 जुलै पर्यंत अतिवृष्टी होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे मागील 24 तासात एकुण 171 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे तर जूनपासून एकुण 902 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. सध्या अतिवृष्टी होत असून धरण सांडव्यावरील पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगवान आहे त्यामुळे गडनदी धरण पहायला जाणा-यांनी धरणात अथवा सांडव्याच्या पाणीप्रवाहात शिरण्याचा प्रयत्न करु नये नाकरीकांनी आपली खबरदारी घ्यावी असे आवाहन उपविभागीय अभियंता जी. आय. इनामदार यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.