गणपती विशेष गाड्यांच्या आणखी ३२ फेऱ्या जाहीर
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर याआधीच जाहीर केलेल्या पाच गणपती विशेष गाड्यांच्या बत्तीस अतिरिक्त फेऱ्या सोडल्या जाणार आहेत.
कोकण रेल्वेमार्गावर या आधीच मुंबई -सावंतवाडी डेली स्पेशल, नागपूर- मडगाव द्वि साप्ताहिक, पुणे -कुडाळ, पुणे -थिविम तसेच पनवेल -थिविम मार्गावर गणपती स्पेशल गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या गाड्यांच्या आणखीन 32 फेऱ्यांना रेल्वेने मंजुरी दिली आहे.
मध्य रेल्वेने या गाड्यांच्या 74 फेऱ्या या आधीच घोषित केल्या आहेत. त्यामध्ये आता आणखी 32 फेऱ्यांची वाढ झाली आहे. यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी नव्याने जाहीर करण्यात आलेल्या अतिरिक्त फेऱ्यांचे आरक्षण या विशेष गाड्याचे आरक्षण् दि. ८ जुलैपासून संगणकीकृत आरक्षण खिडक्यांसह आयआरस्सीटीसी या संकेतस्थळावर आॅनलाईन सुरू होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.