रत्नागिरी दि. ३१ ऑगस्ट : भाद्रपदी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळे येथील प्रसिद्ध स्वयंभू श्रींच्या मंदिरात गणेश चतुर्थी दिनी करण्यात आलेली फुलांची आरास भाविकांसाठी आकर्षण ठरले.
श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सव उत्साहात सुरू आहे. गणेश चतुर्थी दिनी बुधवारी मंदिरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. देवस्थानचे मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर तसेच सहकाऱ्यांनी मिळून ही आरास केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून आकर्षक सजावटीतील बाप्पाचे हे रूप सर्वदूर पोहोचण्यास मदत झाली. भाद्रपदी गणेशोत्सवाच्या सुरुवातीला देखील मंदिर आकर्षक सजावट करण्यात आली होती.