चिपळूण तालुक्यातील फुरुस येथील घटना
चिपळूण : तालुक्यातील फुरूस येथे जंगलात गुरे चरविण्यासाठी गेलेल्या तरूणावर गवारेड्याने जोरदार हल्ला केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर डेरवण रुग्णालय येथे अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
सतीश जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे सतीश हा नेहमीप्रमाणे गुरे घेऊन जंगलात त्याच्या भावाबरोबर गेला असता अचानक झाडीतून गवारेडा आला व त्याने सतिश यांच्यावर हल्ला केला सतीशचा आवाज ऐकून त्याचा भाऊ त्याठिकाणी आला या हल्ल्यात गवारेड्याने सतीश याच्या पोटात शिंग घुसल्याने तो गंभीर जखमी झाला होता त्याला तातडीने डेरवण येथील रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली
फुरुस कोसबी, मुंडे दुर्गवाडी डेरवण हा परिसर अतिशय दुर्मीळ व जंगलमय आहे त्यामुळे लोकवस्ती लगत अनेकवेळा गवारेडा व बिबट्यांचे दर्शन घडते.