उरण दि 24 (विठ्ठल ममताबादे ) : गव्हाण ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी एम डी. पाटील यांनी 7 वर्षे 5 महिने गव्हाण ग्रामपंचायतमध्ये उत्तम काम केले. कोणतेही कार्य असो त्यांनी मनाने एकनिष्टपणे पार पाडले. कोरोना काळातही कोणताही भेदभाव न करता ग्रामविकास अधिकारी एम डी पाटील यांनी शासन स्तरावर अनेक कामे केली. सर्वांना सोबत घेऊन त्यांनी काम केले. त्यामुळे त्यांच्या सारखा उत्कृष्ट, उत्तम अधिकारीची गव्हाण ग्रामपंचायतला नेहमी मदत झाली आहे. त्यांच्या उत्तम कामामुळे त्यांना शासनाचे तसेच विविध संस्थाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्यासारखे उत्तम अधिकारी समाजात खूपच कमी पहायला मिळतात.असे गौरवोदगार कामगार नेते महेंद्र घरत यांनी काढले.
गव्हाण ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी एम. डी. पाटील यांची बदली ग्रामपंचायत दूंदरे येथे झाली त्यानिमित्ताने गव्हाण ग्रामपंचायत तर्फे ग्रामविकास अधिकारी एम डी पाटील यांचा निरोप समारंभ सत्काराचा कार्यक्रम गव्हाण ग्रामपंचायत मध्ये आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महेंद्र शेठ घरत यांनी ग्रामविकास अधिकारी एम डी पाटील यांनी केलेल्या अनेक कामांची प्रशंसा केली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी ग्रामविकास अधिकारी एम डी पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे,गव्हाण ग्रामपंचायत तसेच सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, उपसरपंच विजय घरत,जेष्ठ नेते वामन म्हात्रे यांनी आपली मनोगते व्यक्त करून ग्रामविकास अधिकारी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी कामगार नेते महेंद्र घरत, राजिप सदस्य रविंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतचे सरपंच माई प्रकाश भोईर, उपसरपंच विजय हिरा घरत, माजी सरपंच-जिज्ञासा कोळी, माजी उपसरपंच-सचिन घरत,ग्रामपंचायत सदस्य- हेमंत पाटील, अरुण कोळी, रोशन म्हात्रे, योगिता भगत, कामिनी कोळी, उषा देशमुख, शिल्पा कडू, सूनिता घरत, ज्येष्ठ नेते वामन म्हात्रे, ज्येष्ठ नेत्या – मिनाक्षी कोळी, ग्रामविकास अधिकारी- एम डी पाटील, ग्रामविकास अधिकारी-विजय राठोड,बालविकास विस्तार अधिकारी पूजा चौघुले यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.