Ultimate magazine theme for WordPress.

गिम्हवणे येथे विद्यार्थ्यांची प्रभात फेरी

0 33


दापोली : भारतमाता की जय…वंदे मातरम…अशा उत्साहपुर्ण वातावरणात दापोली शहराजवळील गिम्हवणे येथे विद्यार्थ्यांनी  शुक्रवारी ६ ऑगस्ट रोजी प्रभातफेरी  काढली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित घरो घरी तिरंगा अभियाना अंतर्गत जि. प. केंद्र शाळा गिम्हवणे व निर्मल ग्रुप ग्रामपंचायत गिम्हवणे वणंद व आशा सेविका यांच्या वतीने जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली.

गिम्हवणे येथे आदर्श केंद्र शाळा गिम्हवणे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी,शिक्षक,पालक यांच्या सहभागाने ही प्रभात फेरी काढण्यात आली.गिम्हवणे वणंद ग्रुप ग्रामपंचायत सरपंच साक्षी गिम्हवणेकर,उपसरपंच किशोर काटकर,सदस्य सुभाष झगडे, शैलेश खळे,जागृती झगडे, संजना देवघरकर, मुख्याध्यापक सदाशिव रसाळ,पालक संघ अध्यक्ष मानसी दुबळे,आरोग्य सेविका आशा सेविका,अंगणवाडी सेविका, आदी पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.