https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे पदवी परीक्षेत यश

0 80

शास्त्र शाखा निकाल ९८.९३ टक्के

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या शास्त्र शाखेच्या अंतिम परीक्षेचा निकाल दि. १० जून २०२२ रोजी जाहीर झाला. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांनी सदर परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे.
विज्ञान शाखेचा सरासरी निकाल ९८.४३% लागला. विविध विभागातील ३१ विद्यार्थ्यांना ‘ओ’श्रेणी प्राप्त झाली आहे. गणित विभागातील मुग्धा पोखरणकर ९५.६३% आणि मुक्ताई देसाई ९४.१३ यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला. बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या प्राजक्ता सावंत ९१.१२% हिने तिसरा
क्रमांक प्राप्त केला. पदव्युत्तर शिक्षण विभागातील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी सबंधित विभागात संपर्क करावा; असे आवाहन प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

महाविद्यालयाच्या resgjcrtn.com संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती मिळेल. महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागात अॅनालटीकल केमिस्ट्री २०, ऑरग्यानिक केमिस्ट्री २०, भौतिकशास्त्र विभाग २०, गणित विभाग ४०, संगणकशास्त्र विभाग २०, बायोटेक्नॉलॉजी विभाग २०, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग २० विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी तसेच विभाग प्रमुख यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.