रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे कोकणातील विविध औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात दि. २४ आणि २५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत सदर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
रत्नागिरी शहरातील विद्यार्थी तसेच नागरिक यांनी सदर प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |