Ultimate magazine theme for WordPress.

ग्रामपंचायत बांधपाडा खोपटेच्या भ्रष्टाचारा विरोधात ग्रामपंचायत सदस्यांचे पंचायत समिती समोर उपोषण

0 28

उरण (विठ्ठल ममताबादे ): उरण तालुक्यातील खोपटे बांधपाडा ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून काही शासकीय अधिकाऱ्यांनी याकडे नेहमी दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे विद्यमान सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर व ग्रामसेवक वैभव पाटील यांच्या विरोधात अनेक पत्रव्यवहार करून देखील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नसल्याने शेवटी खोपटे बांधपाडा ग्रामपंचायतच्या 7 सदस्यांनी दिनांक 8/6/2022 रोजी पंचायत समिती उरण समोर भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवत माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शना खाली उपोषण केले. सरपंच विशाखा ठाकूर व ग्रामसेवक वैभव पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सदर उपोषणास ग्रामपंचायतचे उपसरपंच सुजित म्हात्रे, सदस्य रितेश सदानंद ठाकूर,जागृती धरत,भावना पाटील, राजश्री पाटील,करिष्मा म्हात्रे,शुभांगी ठाकूर या ग्रामपंचायत सदस्यांसह खोपटे बांधपाडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपोषणाला महाविकास आघाडीचे सर्व नेते, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला.महाविकास आघाडीचे नेते,माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, काँग्रेसचे नेते महेंद्र घरत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर,माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, तालुकाप्रमुख  संतोष ठाकूर, तालुका संघटक  बी. एन्. डाकी, जि.प. सदस्य विजय भोईर, काँग्रेस तालुका अध्यक्ष  विनोद म्हात्रे,पं. समिती उपसभापती हिराजी घरत, पं. समिती सदस्य दिपक ठाकूर,माजी जि. प. सदस्य वैजनाथ ठाकूर, माजी सरपंच परीक्षित ठाकूर, शिवसेना महिला आघाडी ममता पाटील, सुजाता गायकवाड, वंदना पवार, राजेंद्र म्हात्रे सरचिरणीस शेतकरी कामगार पक्ष खोपटे, भावना म्हात्रे माजी सरपंच,ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष विश्वनाथ पाटील, कैलास म्हात्रे , ज्येष्ठ कांग्रेस नेते केशव घरत, बबन ठाकूर मनसे नेते,अल्पसंख्याक महिला अध्यक्ष मुमताज, मिलिंद भोईर, कृष्णा पाटील अविनाथ ठाकूर, सी.जी. ठाकूर , अजित ठाकूर, दिपाली भगत,प्रिती पाटील , प्रितम पाटील, सुधिर ठाकूर, कमलाकर म्हात्रे, गिरीधर घरत , युवावर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर उपोषणास माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे मोलाचे मार्गदर्शनपर भाषण झाले. तसेच विजय भोईर, दिपक ठाकूर, बी. एन. डाकी यांनी आपल्या भाषणातून प्रशासनाला आक्रमकपणे थेट इशारा देऊन सरपंच तथा ग्रामसेवक यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्याची मागणी केली.
सदरचे उपोषण स्थळी विद्यमान प्रभारी गट विकास अधिकारी  संजय भोये यांनी उपोषण कर्त्यांना लेखी कारवाईचे हमीपत्र दिले. लेखी कारवाईचे आश्वासन मिळाल्याने लिंबू-पाणी घेऊन उपोषण कर्त्यांनी उपोषण स्थगित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.